कंधार/प्रतिनिधी
लातूर बोर्डाकडून घेण्यात आलेल्या मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत शेकापूर येथील महात्मा फुले विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन करून आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयातून परीक्षा दिलेल्या एकुण 121 पैकी 115 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात विशेष प्राविण्य 102 तर प्रथम श्रेणीत 11, तर द्वितीय श्रेणी 02 विद्यालयाचा एकुण निकाल 96.63 टक्के लागला आहे.
विद्यालयातील दहावी वर्गातील प्रथम ,द्वितीय ,तृतीय खालील सविस्तर देण्यात येत आहे.
यावर्षी दहावी चा निकाल 96.63 टक्के लागला असून प्रथम कु. श्रध्दा उध्दव वाघमारे 93.20 टक्के, प्रथम प्रशिक प्रफुल कदम 93.20 टक्के, तृतीय सोनसळे निशांत संजय 92.80 टक्के यांनी गुणानुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. अशी माहिती शाळेकडून देण्यात आली.
या वेळी पर्यवेक्षक रामराव वरपडे ,परीक्षा विभाग प्रमुख सुर्यकांत श्रीमंगले ,संस्कृतीक विभाग प्रमुख व्यंकटराव पुरमवार ., विषय शिक्षक चंद्रकांत पडलवार सर ,आमित लोंड सर ,मोहीत केंद्रे सर ,अनिल बोईवार सर , शिवाजीराव मेंडके सर ,किशनराव ठोंबरे सर ,शेख एम.एम. ,महेद्र बोराळे सर ,बालाजी केंद्रे सर ,संभु वाघमारे सर ,मुकेश केंद्रे ,प्रा सौ.स्वाती रत्नगोले मँडम ,प्रा.विजय राठोड ,प्रा.हाणमंत भालेराव , प्रा. गोविंद आडे, प्रा.अरुण केदार, प्रा.सूर्यकांत गुट्टे, प्रा. देविदास जयभाये, प्रा.भारतलाल सुर्यवंशी, प्रा. गिरीश नागरगोजे, प्रा. मोतीराम नगरगोजे, पञकार एस.पी केंद्रे यांच्याह विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.अदिसह उपस्थित होते.