कंधारः- महेंद्र बोराळे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विभागीय कार्यालय नांदेड अंतर्गत अभ्यास केंद्र (85178) महात्मा फुले कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शेकापूर ता. कंधार,जि. नांदेड येथे 25 जून 2022 ते 16 जुलै 2022 पर्यंत चालणाऱ्या परीक्षेसाठी प्रस्तुत अभ्यास केंद्रातील बि.ए प्रथम, बि.ए दुतीय,बि. ए तृतीय वर्षातील लेखी परीक्षा चालणार आहेत. दरम्यान प्रस्तुत अभ्यास केंद्रात परीक्षा देणारे कर्तव्यावर असणारे ब कर्मचारी,अधिकारी, शिक्षक वर्ग, आरोग्य विभाग, अंगनवाडी, पोलीस ,आर्मी, वनरक्षक, पोलीस नर्स,असे एकूण 1100 विद्यार्थी परीक्षा देत आहेत परीक्षा मुळे विद्यार्थ्यांचे उत्साह चे वातावरण दिसून येत आहेत.
परीक्षे दरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अभ्यास केंद्रावर चार कर्मचाऱ्यांची कमिटी नेमण्यात आली आहे त्या मध्ये अभ्यास केंद्राचे केंद्र प्रमुख प्रा.जायभाये देविदास मारोती , केंद्र सहाय्यक मोरे त्रिभुवन विठ्ठलराव , तांत्रिक सहाय्यक केंद्रे मुकेश विषुकांत , केंद्रे राजीव भगवान यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाने बाह्यपरिक्षक म्हणून डॉ. प्रा.परीक्षित धोंडगे सर यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रस्तुत अभ्यास केंद्र ग्रामीण भागात असल्यामूळे विद्यापीठाचे सर्व नियम पाळून परीक्षा सुरोळीत चालू आहेत. या साठी विभागीय केंद्र नांदेड येथील मा.डॉ. मोहन सर (वरिष्ट शैक्षणिक सल्लागार)मा. डॉ. चंद्रकांत पवार सर (कुलसचिव य. च. महा. मुक्त. विद्यापीठ नाशिक, विभागीय केंद्र नांदेड)व सर्व विभागीय केंद्रातील कर्मचारी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभते.
संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री.मा .संभाजीराव पाटील केंद्रे साहेब तसेच संस्थेचे सचिव श्री शिवाजी संभाजीराव पाटील केंद्रे आणि प्राचार्य श्री मोतीराम पंडितराव केंद्रे ,प्रर्यवेक्षक रामराव वरपडे सर , परीक्षा विभाग ज्युनिअर . प्रा.आडे सर , परीक्षा विभाग माध्यमिक सुर्यकांत श्रीमंगले सर , बोराळे महेंद्र सर , प्रा.सुर्यकांत गुट्टे सर , प्रा.अरूण केदार सर , प्रा गिरीश नागरगोजे सर , प्रा .सूर्यवंशी सर , सौ.प्रा .रत्नगोले मॅडम , प्रा .पाटील सर, प्रा.राठोड सर ,.प्रा.मोतिराम नागरगोजे सर ,आमित लोंड सर ,शिवाजी मेंडके सर, सौ. गित्ते मॅडम , मोहित केंद्रे सर , पडलवार सर , पूरमवाड सर , शेख सर , बोईवार सर ,किशन ठोबरे सर,एस.पी.केंद्रे सर , शंभू वाघमारे आदिसह. सर्व प्राध्यापक वर्ग परीक्षा सुरोळीत पारपाडण्या साठी मेहनत घेत आहेत.