कंधार
शिवसेनेच्या 40आमदारांनी शिवसेने सोबत मोठे बंडकेले असल्याने ठाकरे सरकार धोक्यात आले आहे.शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली असली तरी शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या सोबत असल्याने आज ही शिवसेना पुर्वी सारखीच आक्रमक बणुन बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे.नांदेड उत्तरचे आमदार हे शिवसेनेमुळेच निवडुन आले असल्या तरी त्यांनी ही बंड केल्याने नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधात दिनांक 27जुन रोजी शहरातील महाराणा प्रताप चौकात जोडे मारो अंदोलन केले.
यावेळी बंडखोर आमादारांच्या विरोधात घोषणाबाजी करुन परिसर दणावुन सोडला.यावेळी बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.गत आठ दिवसांत सुरू असलेला शिवसेनेच्या आमदारांनी केलेली बंडखोरी तळागाळातील शिवसैनिकांच्या मधाला लागली असुन तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे.या यावेळी शिवसेना नेते अॕड. मुक्तेश्वर धोंडगे,गणेश कुंटेवार,तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव,तालुका संघटक पंडीतराव देवकांबळे,शहरप्रमुख बाळू पाटील लुंगारे,पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण,वहातुक सेना तालुकाप्रमुख व्यंकट मोरे,सर्कलप्रमुख अॕड. भगवान जाधव, शिवाजी पाटील कदम धानोरा,शेल्लाळी संरपंच राजु केंद्रे माधव लुंगारे,अजिंक्य यन्नावार,अतुल पापीनवार,अल्ली साहेब, नागोराव जाधव,चंद्रकांत शेंडगे,पंडीतराव पेठकर,प्रल्हाद जाधव,माधव लुंगारे,प्रकाश जाधव,गणेश फुलवळे,राजीव लुंगारे, जगदीश राठोड,मनोहर लुंगारे,मनोहर पेठकर, शिवप्रसाद जाधव,बालाजी पेठकर, गंगाधर लुंगारे यांच्या सह अनेक युवासैनिक,शिवसैनिक उपस्थित होते.