रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडीची कंधार तालुक्यातून सुरुवात;जिल्हा कृषी अधिक्षक रविशंकर चलवदे यांनी केले मार्गदर्शन

कंधार ; प्रतिनिधी

कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत
तालुका कृषी अधिकारी कंधार कार्यालयामार्फत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड तथा प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार दि.२८ जून रोजी कंधार तालुक्यामध्ये कृषी संजीवनी मोहिमेचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले

या मोहिमेच्या निमित्त बहादरपुरा व बिजेवाडी येथिल शेतक्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी मार्गदर्शन केले

तसेच नांदेड जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडीचे पहिली फळबाग लागवड बिजेवाडी येथून शुभारंभ कंधार तालुक्यातून करण्यात आली

यावेळी हनुमंत पेटकर मनोहर पेठकर माकान चन्नावार सुरेश राठोड श्रीमंगले तसेच अनेक शेतकरी व कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपेलवार , मंडळ कृषी अधिकारी कंधार रोहिणी पवार , कृषी सहाय्यक एम एस गुट्टे , शीलाताई पानपत्ते , अनुसया केंद्रे व आत्म्याचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *