विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनासाठी उपयोजनात्मक शिक्षणाची गरज – प्रा. शंतनू कैलासे

लोहा : दहावी, बारावीमध्ये शेकडा गुण अधिक मिळावेत, यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, यासाठी प्रचंड ओढातान सुरू आहे. पण यातील सर्वच जण यात यशस्वी होत नाहीत. याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. पण उपायोजनात्मक शिक्षण हे विद्यार्थ्यांना जगण्यासाठी उपयोगी पडू शकते, अशा शिक्षणाची आता गरज आहे, असे मार्गदर्शन ग्लो अॅण्ड ग्रो इंग्लीश स्कुल कंधार चे संचालक तथा इंग्रजीचे तज्ज्ञ शिक्षक प्रा. शंतनू कैलासे यांनी केले.

जिल्हा परिषद कें द्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत जय महाराष्ट्र प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित शिक्षकांना प्रा. शंतनू कैलासे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी केंद्र प्रमुख एन. एस. कसबे, मुख्याध्यापक शिवधन राठोड, मुख्याध्यापिका श्रीमती कुंटे, जय महाराष्ट्र शाळेचे मुख्याध्यापक संतोष भालेराव, माजी चेअरमन ज्ञानोबा घोडके, दिलीप कहालेकर, रावण वाघमारे, दिलीप सोनवळे, यासह केंद्र
अंतर्गत मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

इंग्रजीचे तज्ज्ञ प्रा. शंतनू कैलासे यांनी सध्याची शिक्षण व्यवस्था आणि हाँगकाँग व अन्य देशातील शिक्षण व्यवस्था यांची तुलनात्मक विवेचन अतिशय प्रभावीपणे केली. दरवर्षी प्रा. शंतनू हे वेगवेगवेगळ्या देशात स्वतः जातात आणि तेथील शाळांची पाहणी करतात. तेथील शिक्षकांची. ते संवाद साधतात व तेथील शिक्षणाची पद्धती आपल्या शाळेत वापरतात. याचे सोदाहरण देताना कोणती शिकविण्याची पद्धती योग्य आहे हे अनेक उदाहरणे देऊन त्यांनी सांगितले.

या वेळी एस. एन. केंद्रे, चंद्रकांत वाडकर, बापू गायखर, सौ. प्रिया पारसेवार यांनी मार्गदर्शन केले. आरंभी शाळेचे मुख्याध्यापक संतोष. भालेराव यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सुत्रसंचालन बापू गायखर यांनी केले. जय महाराष्ट्र प्राथमिक शाळेत शिक्षक एस. एम. कवठेकर, एन एन. वाघमारे, एस. एस. कुलकर्णी, आर. आर. पारेकर, एस. एम. राठोड, सौ. जे. डी. चोले, बालिका आडगावकर यांची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *