मसाप केंद्रीय कार्यकारीणी सदस्य कविवर्य देविदास फुलारी यांच्या हस्ते दत्तात्रय एमेकर यांचा सत्कार

नंदीग्राम नगरीत शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात गोरज मुहूर्तावर कवि, साहित्यिक प्रा.महेश मोरे लिखित “बोऱ्याची गाठ “कादंबरीचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार होता.त्यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य कौतिकराव ढाले पाटील,( अध्यक्ष मसाप औरंगाबाद)
शुभहस्ते- मा.प्राचार्य अशोकराव गवते पाटील,( प्राचार्य-संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा) प्रमुख पाहूणे-प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम धोंडगे(अध्यक्ष-श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार)
वक्ते-मा.देविदास फुलारी(संचारमंत्री तथा नरहर कुरुंदकर पुरस्कार प्राप्त) सुत्रसंचलन मा.प्रा.पृथ्वीराज तौर(मराठी विभाग प्रमुख स्वा.रा.ती.विद्यापीठ नांदेड) स्थळ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह वरचा मजला नांदेड. वेळ गोरज मुहूर्तावर. अशी कादंबरी प्रकाशन सोहळ्या निमंत्रण पत्रिका कादंबरीचे लेखक कवि प्रा.महेश मोरे यांनी कंधार शहरातील शिवाजीनगरातील गोकुळ निवासस्थानी जागतिक कविता दिनाच्या दिवशी दिली.त्यावेळी जागतिक कविता दिनी माझ्या लेखनीतून निर्माण काव्य प्रा.महेश मोरे सर यांनी काव्या त्यांच्या बहारदार आवाजात सादर करुन मला प्रोत्साहित केले.त्यावेळी कविराज मोरे सरांनी शब्द दिला. मला यावर कांहीतरी वेगळच लिहायच आहे.अन् लागलीच प्रकाशन काव्य शब्दबध्द झाले.हे प्रकाशन काव्य पहिल्यांदा माझे मार्गदर्शक प्रकाशन सोहळा ज्याच्या करकमलांनी नियोजित प्राचार्य अशोकराव गवते पाटील यांना पहिल्याप्रथम वाचुन दाखवले.त्यांनी माझे लगेच कोडकौतुक करताच मला आकाश ठेंगणे वाटले.त्याच प्रकाशन सोहळ्यात माझा सत्कार .होणार होता.पण माझ्या अडचणीमुळे अन् कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांना मुंबई येथे जावे लागल्याने हा सत्कार १९ जुन २०२२ रोजी छ.शंभू राजे इंग्लिश मीडियम स्कूल वीर नागोजी नाईक चौक कंधार या ज्ञानालयाच्या प्रांगणात माझे उर्जास्त्रोत,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,मुक्ताईसुत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या शतकोत्सवी उपक्रमाच्या आढावा बैठकीत झाल्याने माझ्या लेखन कौशल्यास बळ मिळाले.नंदीग्राम नगरीतील कविराज व साहित्यिक मंडळीं मसाप केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा .कविराज देविदास फुलारी सर,मसाप शाखा नांदेडचे उपाध्यक्ष मा.दिगंबर कदम सर,बोऱ्याची गाठ कादंबरीचे लेखक कविराज प्रा. महेश मोरे सर ,कवि कुमार अभंगे या सर्व साहित्यिक मंडळीचे शतशः आभार व मानाची कोटी-कोटी जयक्रांति.

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *