नांदेड ; प्रतिनिधी
बरबडा संकुल अंतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन
आज दिनांक 27 जून 2022 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचे शिक्षण परिषदेचे आयोजन केंद्रीय प्राथमिक शाळा बरबडा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी पंचायत समिती नायगाव येथील गटशिक्षणाधिकारी श्रीयुत कृष्णकुमार फटाले सर तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बरबडा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. शिक्षण परिषदेतील सुलभक यांनी शिक्षण परिषदेतील विषयावर मार्गदर्शन केले.
सदरील परिषदेतील कार्यक्रमाच्या वेळी फटाले सर यांनी इयत्ता पहिली ते आठवी तील सर्व विद्यार्थ्यांनी पायाभूत शिक्षण व मुलभूत क्षमता प्राप्त करणे यासाठी सर्व शाळेतील शिक्षकांनी नियोजनानुसार अध्यापन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच विद्याप्रवेश व सेतू अभ्यासक्रम या विविध उपक्रमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे सूचित केले.
सदरील शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी केंद्राचे केंद्रप्रमुख रेडेवाड सर, केंद्रीय मुख्याध्यापक गुंटे सर, तसेच प्राथमिक शाळा अंतरगाव येथील मुख्याध्यापक दमकोंडवार सर यांनी परिश्रम घेतले. सुलभक म्हणून आमलापुरे सर, राहुल भद्रे सर, मारोती अंबुलगे सर यांनी विषय प्रतिपादन केले. सर्व विषय विवेचनानंतर शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.