अहमदपूर ; प्रा भगवान आमलापुरे
दिनांक:- 26/06/2022 रोजी सांय. 6:00 वा. अहमदपूर तालुका पदाधिकारी व माळी समाज बैठक नरसिंह मंदिर, माळी गल्ली येथे संप्पन….
सदरील बैठक अहमदपूर तालुका युवक अघाडी अध्यक्ष अमोल राअत यांच्या पदाधिकारी फंडातून घेण्यात आली
समाजातील जेष्ठ नागरीक प्रकाश बाबुराव मेहत्रे यांच्या अध्यक्षतेत श्री संत सावता महाराज, फुले दांपत्य यांच्या मूर्तिला व लोकराजा श्री छत्रपती राजश्री शाहु महाराज यांच्या 148 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पूष्पहार आर्पण वअभिवादन करुन महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तथा मार्गदर्शक दत्तात्रय माळी, प्रदेश सरचिटणीस उत्तम जी.गोरे यांच्या प्रमुख उपस्थित संप्पन झाली.
या वेळी प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय माळी यानी महात्मा फुले ब्रिगेड ही संघटना माळी समाजाच्या विकासासाठी 5 ते 7 वर्षा पासून संघटनेच्या विविध योजनाच्या माध्यमातून कशा प्रकारे समाजहिताचा विचार करुन सामाजिक कार्य करत आहे याचे सविस्तर विश्लेशन केले.
समाज बांधवानी संघटनेच्या विवध योजनांचा लाभ स्वत: घेऊन आपल्या परीवारातील व समाजातील इतर बांधवाना कसा मिळवून द्यायचा याची सविस्तर माहीती सांगितली….
संघटनेच्या वतीने समाजातील 60 वर्षा पुढील जेष्ठ स्त्री-पुरूष तसेच अपंग, कॅन्सर रूग्ण व विधवा महिला यांच्या करिता…
१) श्री संत शिरोमणी सावता महाराज पेन्शन योजना, विद्यार्थ्यांसाठी…
२) सावित्रीआई फुले शिष्यवृती योजना, समाजातील उपवर मुला-मुलींच्या विवाहासाठी…
३) क्रांती-ज्योती विवाह योजना,
बेरोजगार युवक-युवतीसाठी…
४) महात्मा फुले स्वालंबन योजना व नव्याने सुरु होत असलेल्या…
५) श्री संत सावता महाराज वैद्यकिय अर्थिक मदत योजना या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. बैठकित गावातील संघटनेच्या योजने अंतर्गत..प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या हास्ते लाभार्थी पात्र विद्यार्थी व जेष्ट नागरिकानां शिष्यवृत्ती व पेनशन वाटप करण्यात आली.
या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष नरहरी शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पवळे, जिल्हा सह संपर्क प्रमुख सचिन शेलार, औसा संघटक सुनिता शेलार, जिल्हा उपसचिव देवराज गोरे अहमदपूर तालुकाध्यक्षा कविता गोरे, शहर उपाध्यक्ष बाबुराव आरसुडे व प्रयागबाई शेलार, संगिता शेलार इ. पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीचे प्रस्ताविक उत्तम जी. गोरे यानी तर सुत्रसंचालन व अभार प्रदर्शन युवक अघाडीचे प्रदेश सरचिटणीस शाम गोरे यांनी केले.
सदरील बैठकीला समाजातील स्त्री-पुरुष तसेच या वर्षी १० वी व १२ वी मध्ये उतिर्ण विद्यार्थी लहान थोरासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.