कंधार : दिगांबर वाघमारे
झाडे लावा झाडे जगवा ,वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशी संतानीही झाडाची महती जगाला पटवून दिली आहे.परंतु ब-याच ठिकाणी मोठ्या उत्साहाने वृक्षाची लागवड केली जाते मात्र त्याचे संगोपन होताना दिसत नाही.वृक्षसंगोपणाचा हाच धागा पकडून
हरीत कंधार परीवाराच्या वतीने वृक्षलागवड उपक्रम २०१७ पासून चालू आहे आतापर्यंत बारा हजार वृक्षारोपण करण्यात आले या वर्षी कृषि दिनानिमित्त १जुलै २०२२ रोजी सकाळी १० वाजता कासारखेळा पांगारा येथे प्रायोगिक तत्त्वावर घन जंगल लागवडी अंतर्गत दोन हजार वृक्षालागवड मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे
यावेळी निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व किमान एक झाड आपल्या हस्ते लावावे जणे करून शेकडो वर्ष आपली आठवण राहील असे हरित कंधार परिवाराच्या वतीने आव्हान संयोजक शिवा मामडे ,शहाजी नळगे,प्रदीप गरुडकर,ॲड .गंगाप्रसाद यन्नावार ,अजय मोरे,योगेंद्रसिंग ठाकूर ,राजरत्न सुर्यवंशी ,रमाकांत फुके ,संजय ढगे,दिपक गरुडकर ,सागर डोंगरजकर ,हौसाजी कागणे ,विश्वनाथ पांगरेकर ,नामदेव सुवर्णकार ,संजय सोनकांबळे,प्रविण बनसोडे,जितेंद्र गरूडकर आदींनी केले आहे.