नांदेड
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट घेतली असून
राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आणि या बदलाचे केंद्र मुंबई स्थित सागर बंगला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीत जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर या पिता-पुत्रांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट आ बुधवार दि.२९ जुन रोजी घेतली. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही.
सत्ता आली तर प्रवीण पाटील चिखलीकर यांना मोठी जबाबदारी मिळू शकते. अशी चर्चा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर निकटवर्ती यांच्या गोटात सुरू आहे. भेटी दरम्यान मुखेड चे आमदार डॉ तुषार राठोड यांची उपस्थिती होती .