डॉ.फरजाना बेगम यांना डॉक्टरेट पीएचडी प्रदान

कंधार/


नांदेड देगलूर नाका येथील वसंतराव काळे येथील उर्दू विषयाचे साहाय्यक प्राध्यपिका म्हणुन कार्यरत असलेल्या प्राध्यापिका डॉ.फरजाना बेगम यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. कंधार येथील सध्या नांदेड येथे स्थायिक झालेले सामाजिक कार्यकर्ते गुलाम शाहींदर यांच्या त्या सौभाग्यवती आहेत.

डॉ.फरजाना बेगम यांनी डॉक्टर इरशाद अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली उर्दू विषयात ” बिस्वी सदी की ख्वातीन नावेल निगार ” विशेषतः नजर सज्जाद हैदर , सजीहा आबेद हुसेन , जिलानी बानू या तीन विशेष उदाहरणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ला सादर केलं असता तो शोध निबंध विद्यापीठ ते स्वीकारून फरजाना बेगम यांना डॉक्टर (पीएचडी) बहाल केले

या पदवीचे श्रेय त्यांनी त्यांची आई वडील पती गुलाम शाहिंदर व भाऊ फिरोज खान यांना व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांना देतात.प्राध्यपिका डॉ फरजाना बेगम यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *