कंधार ; प्रतिनिधी
यावेळी आम आदमी पार्टी कंधारचे जेष्ट कार्यकर्ते विठ्ठलराव डांगे, कंधार तालुका अध्यक्ष साईनाथ मळगे, तालुका उपाध्यक्ष तिरुपती इंगळे, तालुका सचिव नितीन भोसीकर, तालुका उपाध्यक्ष बबन केंद्रे, तालुका उपाध्यक्ष श्याम जोंधळे, सदस्य अविनाश फुले आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
आम आदमी पार्टी कंधार तालुका अध्यक्ष साईनाथ मळगे यांच्या नेतृत्वाखाली पुढील प्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये
कंधार तालुका संपर्कप्रमुख पंढरी बाबाराव मोरे, जनार्धन शेषराव मोरे (सर्कल प्रमुख गऊळ) ज्ञानेश्वर गोविंदराव यादव (सर्कल प्रमुख कौठा) मधुकर गणेश मंगनाळे (गण प्रमुख गऊळ)
गोपाळ प्रकाश मोरे (गण प्रमुख दिग्रस) आदिची बिनविरोध निवड करण्यात आली .
दिल्ली सरकारने ज्याप्रकारे दिल्लीमधील सरकारी शाळा कॉलेज,मोहल्ला क्लीनिक, 24 तास लाईट फ्रि, सरकारी दवाखान्यांमध्ये फ्री इलाज अनेक बरेच काही विकास कामे केली आहेत.
महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणाच्या बाहेर पडून एक इमानदार पार्टीमध्ये नव तरुणांनी तरुणींनी, ज्येष्ठ नागरिकांनी आम आदमी पार्टीमध्ये सामील व्हावे व महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीची ताकद वाढवावे असे आवाहन यावेळी पदाधिकारी यांनी केले.