कार्यालयीन वेळेत कार्यालयात गैरहजर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा – माजी सैनिक संघटना

कंधार

तहसिल कार्यालयामध्ये जनतेचे कामे वेळेत होत नाहीत वारंवार तहसिल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशा तक्रारी प्राप्त झाल्याने आज दि.४ जुलै रोजी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी केली तेव्हा बरेच कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर होते .या सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी माजी सैनिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .

कंधार तहसिल कार्यालयातील कर्मचारी बाबत वेळोवेळी तक्रारी होतात जे काम पंधरा दिवसात होणारे असते त्या कामाला पंधरा महिने तहसिल कार्यालयाच्या चक्रा मारुन सुध्दा जनतेला न्याय मिळत नाही. वशीला घेवून काम करणे असे प्रकरणे नेहमीच घडत असून वेळोवेळी

तहसिलदार व संबधित नायब तहसिलदार यांना यांना तोंडी विनंती केली तसेच तहसिलदार यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या परंतू तहसिल कर्मचाऱ्यांवर कुठलीच वेळेवर कार्यवाही झाली नाही अशी तक्रार आज निवेदनात करण्यात आली.

विशेष म्हणजे तहसिल कार्यालयामध्ये कर्मचारी हे कधीच वेळेवर येत नसले तरी कार्यालयाचा वेळ संपण्यापूर्वीच घरी निघून जात आहेत त्यामुळे या सर्व कामचुकार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .

यावेळी माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड , पोचीराम वाघमारे , कंधार तालुका अध्यक्ष कांबळे आदीसह माजी सैनिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *