गणपतराव बाबाराव मुंडे यांचे निधन

कंधार ; प्रतिनिधी

जुना लोहा तालुका लोहा येथील रहिवाशी गणपतराव बाबाराव मुंडे ( वय १०० वर्षे) यांचे आज दिनांक ५ जुलै २०२२ रोजी दुपारी ४:१५ वाजता दीर्घ आजाराने त्यांचे राहते घरी लोहा येथे निधन झाले. त्यांच्यावर उदया दिनांक ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता जुना लोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

कै .गणपतराव बाबाराव मुंडे यांनी आपल्या हयातीत व्यापारी म्हणून मोठे नाव कमावले होते , त्यांनी समाजसेवा करताना अनेक लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला .

त्यांच्या पश्चात ३ मुले १ मुलगी नातवंडे पणतू असा मोठा परीवार आहे.गणपतराव बाबाराव मुंडे हे संत गाडगे बाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी.एन.केंद्रे साहेब यांचे ते सासरे व संस्थेचा कोषाध्यक्षा सौ. मुक्ताबाई दौलत केंद्रे यांचे ते वडील होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *