नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड रेल्वे स्थानकावर गुरुद्वारा लंगर साहब,भाजप,शिवसेना, काँग्रेस,मनसे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, नानक साई फाउंडेशन, गोरक्षक दल, अमरनाथ यात्री संघ, लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी केली. शाल, शिरोपाव मोत्याची माळ हार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यात्रेकरूंचे वैद्यकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी सहकार्य करणारे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. शिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी निवासी डॉ.साखरे यांचा सत्कार करण्यात आला. यात्रेकरूंना प्रत्येकी एक वेळेसचे भोजन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, दीपकसिंह गौर संभाजीनगर, नवनाथ सोनवणे उदगीर, नागनाथ शेट्टी,हृदयनाथ सोनवणे, मनोज शर्मा नागपुर, प्रदीप शुक्ला भोपाळ, बापू महाजन, भुसावळ,कवि प्रताप फौजदार दिल्ली, सरदार सुदीपसिंघ अमृतसर, सुभाष बंग, ज्ञानोबा जोगदंड जम्मू, सुप्रिया रितेश चव्हाण जालना यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. जगन्नाथ सोनवणे, डॉ. अजयसिंग ठाकूर पूर्णा,सतीश सुगनचंदजी शर्मा,स्नेहलता जैस्वाल हैदराबाद,स्वाती कुलकर्णी,धोंडोपंत पोपशेटवार,
राजेश डुलगच संभाजीनगर हे अल्पोहार देणार आहेत. यात्रेकरूंसाठी नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेचे सदानंद मेडेवार यांनी मोफत औषधी दिल्या आहेत.
अमरनाथ च्या पहिल्या जत्थ्यामध्ये
प्राचार्य आत्माराम पळणीटकर,
प्रा. नंदकुमार मेगदे, पत्रकार
विनोद कापशीकर, बँक मॅनेजर सुधीर विष्णुपुरीकर,
अरुणकुमार काबरा,सुभाष देवकते ,धोंडोपंत पोपशेटवार,
घनश्याम शर्मा, पांडुरंग चंबलवार,दत्तात्रय कोळेकर,शिवाजीराव मोरे, ओमकार बंगरवार, सदाशिव देबडवार,रत्नाकर केसकर,सुभाष भाले ,विलास आराध्ये,
गंगाधर नगनुरवार, हरिहर नारलावार,धोंडीबा भाडेकर, श्रीनिवास दायमा,
सत्यनारायण बालमुकुंद दायमा,
रामकिशन सोनटक्के,
अशोक शेंद्रे ,
गोपाळराव सुरवसे,अशोक काप्रतवार,संजय बच्चूवार ,
एन. संदीप रेड्डी ,
ए.श्रीनिवास,सत्यनारायण गुलाबचंद दायमा,केशवराव महाजन हे सपत्नीक सहभागी झाले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी दीपकसिंह गौर,प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंदजी शर्मा,कामाजी सरोदे,डाॅ.शुभम कोळेकर,गजानन पत्रे, विष्णू चव्हाण,किरण बेले,
महेश शंखतीर्थकर,भाऊसाहेब कदम,श्रीपत माने,सुधाकर डांगे,बालाजी सोनटक्के,चिंतामण जाधव,संदीप कदम, प्रभाकर बेले ,अनंत काप्रतवार, के. आनंद, पी.अनिवेषबाबू ,के.शोभनराव, जी.चंद्रशेखर गौड ,एम.राजेंद्रराव , जे. व्यंकटरामाराव हे सहभागी झाले आहेत. भारती नेरलकर,संजीवनी रत्नाकर वाघमारे,
गीतादेवी राजपूत,अर्पिता आशिष नेरलकर ,मीनाक्षी पुजारी,बिना काकोडकर, प्रतिभा नेरलकर,प्रिया उन्हाळे, अनिता नेरलकर
शरयू नेरलकर , रूपाली देशमुख, अश्विनी भार्गव, शोभा जोशी,
सुमित्रा टाकळीकर,आशालता स्वामी, उमा सोमवंशी,
टी.लता या महिलांचा समावेश आहे.श्रेणीका बच्चूवार ,अनुष्का राजपूत,श्रेयस बच्चूवार , ए. मनस्वीनी ही तरुण मंडळी उत्साहात
जोरजोरात घोषणा देत होती. निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नांदेडकर उपस्थित राहिल्याबद्दल संयोजक दिलीप ठाकूर यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
(छाया:करणसिंह बैस, व्यंकटेश वाकोडीकर)