गेल्या 18 वर्षापासून सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेला कोविड 19 च्या काळामध्ये खंड पडला आणि सर्व यात्रेकरूंचा जणू ठोका चुकला आता यात्रा कधी सुरू होईल या प्रतीक्षेत प्रत्येक भाविक होता आणि कोरोनाने काही काळ विश्रांती घेतल्याने यावर्षी यात्रा निघण्याचे जाहीर झाले. प्रत्येक जण अमरनाथ यात्रेत येण्यास उत्सुक होता. त्यामुळे आपला नंबर यावेळेस लागतो की नाही याची चिंता भाविकात निर्माण झाली. दोन वर्ष गॅप झाला असल्यामुळे बुकिंग साठी झुंबड घेऊन आली. पहिल्या जथ्यातील 100 चा कोटा कोटा हा हा म्हणता संपला संपला अनेकांची निराशा झाल्यामुळे दुसरा जथा जथ्थ्यासाठी बुकिंग सुरू केली. त्यातही शंभरी गाठल्यामुळे बुकिंग बंद केले. दोन वर्ष अमरनाथचे दर्शन चुकल्यामुळे यावर्षी एक मात्र चांगले झाले की ,
दोनदा दर्शन घेण्याची भगवंताने संधी दिली.
यात्रेकरूंची बुकिंग पूर्ण होताच जाण्याच्या चार महिने आधीपासून श्रीराम सेतु गोवर्धन घाट येथे चालण्याचा सराव आम्ही सुरू केला. दररोज सहा किलोमीटर पायी चालणे व त्यानंतर अर्ध्या तासाचे प्राणायाम यामुळे अमरनाथ यात्रेसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सर्व जन सक्षम झाले. रत्नेश्वरी पाऊस दिंडीमध्ये शारीरिक दृष्ट्या कोण कितने पानी मे है याचा प्रत्येकाला प्रत्यय आला. यात्रेचा दिवस जसा जसा जवळ येत तसा प्रत्येकाच्या मनात उत्साह दिसून येतो होता.
प्रत्यक्ष यात्रेला जाण्याच्या एक दिवस आधी सर्व तयारीचा पुन्हा एकदा आढावा घेतला. एकेक तिकीट तसेच आय कार्ड व यात्रा पर्ची सर्व काही व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करण्यासाठी प्राचार्य आत्माराम पळणीटकर, सुधीर विष्णुपुरीकर आणि कामाजी सरोदे यांची बहुमूल्य मदत झाली. रात्री दीड वाजता आमचे काम संपले.
दररोजच्या सवयीप्रमाणे सकाळी साडेचारला जाग आली. प्रात्यविधी आटपून योगाभ्यास केला. सहा वाजता जे यात्रेकरू बाहेर जाऊन नांदेडला येणार होते ते कुठपर्यंत आले याची चौकशी केली.सकाळी आठला वडिलांचा आशीर्वाद घेऊन घर सोडले.घराजवळील सोन्या मारोती मंदिर तसेच स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेताना यात्रा सुखरूप पार पडण्यासाठी साकडे घातले. हॅलो सर्वांना साडेआठ वाजता स्टेशनवर येण्याच्या सूचना दिल्या होत्या मी बरोबर साडेआठला पोहोचलो पाहतो तर काय माझ्याआधी जवळजवळ सगळेजण आले होते. यात्रेकरूंचा वक्तशीरपणा पाहून बरे वाटले. आम्हाला निरोप देण्यासाठी आलेल्या अनेकांच्या हातात पुष्पहार, पुष्पगुच्छ होते. अमरनाथ यात्री संघातर्फे लावण्यात आलेले बँड पथक उपस्थित यांचे लक्ष वेधून घेत होते.गुरुद्वारा लंगर साहिबांच्या वतीने प्रत्येक भाविकांचा शिरोपाव देऊन सत्कार करण्यात आला. बम बम भोले जय मातादी जो बोले सोनिहाल यासारख्या घोषणांनी वातावरणात उत्साह भरला होता. प्लॅटफॉर्म नंबर एक गर्दीने तुडुंब भरला होता. बरोबर साडेनऊला रेल्वेने प्रस्थान केले आणि सोडावयास आलेल्या भाविकांच्या नातेवाईकांनी प्रसन्न मनाने डोळ्यात आनंदाश्रू आणून निरोप दिला.
सचखंड एक्सप्रेस पूर्णा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर परभणी जिल्हा भाजप उपाध्यक्ष अजय ठाकूर यांनी दिलेल्या पुरणेच्या प्रसिद्ध मसाला वड्याचा आस्वाद सर्वांनी घेतला. परभणीला अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा सुषमा ठाकूर व नरसिंह ठाकूर यांनी उपवासाचे पदार्थ दिले. प्रवासादरम्यान यात्रेकरू एकमेकांशी संवाद साधत मार्गक्रमण करत होते .भजन गाणे यामुळे वातावरण भक्तीमय झाले . दुपारी सचखंड एक्सप्रेस संभाजीनगर रेल्वे स्थानकावर आली. आमच्या सोबत यात्रेला येणारे दिपकसिंह गौर, भाऊसाहेब कदम,श्रीपत माने,सुधाकर डांगे,बालाजी सोनटक्के,चिंतामण जाधव या
यात्रेकरूंनी सर्वांसाठी गरमागरम भोजन आणले होते. रुचकर भोजनाचा आस्वाद यात्रेकरूंनी घेतला.कामगार सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांचे भाऊजी राजेश दुलगच यांनी दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे पाठवलेले तारा चे प्रसिद्ध मसाला पान सर्वांनी आवडीने खाल्ले. संभाजीनगर ते भुसावळ हा प्रवास काहींनी वामकुक्षी घेत तर काहींनी व्हाट्सअप पहात पूर्ण केला.
सचखंड एक्सप्रेस भुसावळ र स्थानकावर येत असताना दरवाज्यात उभा होतो. त्यावेळी प्लॅटफॉर्म वरील अनाउन्समेंट मध्ये आमच्या ग्रुपच्या स्वागताची उद्घोषणा ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. या ठिकाणी बापू महाजन, ॲड. दायमा यांच्या सह वीस ते पंचवीस जणांनी आमचे जल्लोषात स्वागत केले. खानदेशी पद्धतीच्या अस्सल गावरान भोजनाचे पार्सल त्यांनी दिले. पिठले भाकर, कांदा लिंबू, लोणचे, राईस व कढवलेले तेल हा मेनू सर्वांना आवडला. आमचे जेवण झाल्यानंतर देखील भरपूर पदार्थ शिल्लक होते. रेल्वेमध्ये असलेले अन्य प्रवासीही कोणीही उपाशी राहू नये यासाठी
अमरनाथ का लंगर लो भाई असे सांगून जेवण वाटले. यासाठी अरुण काबरा, सुभाष देवकते,धोंडोपंत पोपशेटवार, शुभम कोळेकर, शिवाजी मोरे , दत्तात्रय कोळेकर, पांडुरंग चंबलवार, किरण बेले, विष्णू चव्हाण, गजानन पत्रे, ओमप्रकाश बंगरवार यांनी परिश्रम घेतले. रात्री साडेदहाच्या सुमारास अमरनाथच्या गुहेतून हा लेख पत्रकार विनोद कापशीकर यांच्यासोबत लिहिला.
बर्थ वर पडल्या पडल्या झोप कधी लागली हे समजले देखील नाही.
( क्रमशः)