अहमदपुर ( प्रा भगवान आमलापुरे )
यावेळी सत्कारपीठावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य पवार पी यू होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, प्रबोधनकार ह भ प संजय महाराज नागपुर्णे , प्राध्यापक - कवी भगवान आमलापुरे , पर्यवेक्षक चव्हाण बी एस आणि मोहजकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांना त्यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वांना वृक्षप्रतिज्ञा देण्यात आली. लगेचच अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि वर्गशिक्षकांच्या हस्ते अनुक्रमे १२ वी आणि १० वी बोर्ड परिक्षेत केंद्रात सर्वप्रथम आणि सर्वद्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाल, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप होते.
यात १२ वी विज्ञानमध्ये केंद्रात सर्वप्रथम आल्याबद्दल कु प्रतिभा चव्हाण, ८३ : ०५ / तर सर्वद्वितीय आल्याबद्दल कु संगिता गणेशराव पवार हिचा सत्कार करण्यात आला. १२ वी कला शाखेत केंद्रात सर्वप्रथम आल्याबद्दल अजय राजू राठोड तर सर्वद्वितीय आल्याबद्दल अनिल गोविंदराव आडे चा सत्कार करण्यात आला. १० वी शालांत परिक्षेत केंद्रात सर्वप्रथम आल्याबद्दल कु संजिवनी साहेबराव ढवळे चा तर सर्वद्वितीय आल्याबद्दल कु रूहाना गफूरभाई शेख चा सत्कार करण्यात आला.
तदनंतर प्रा भगवान आमलापुरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. एन डी राठोड आणि संजय महाराज नागपुर्णे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्य पवार पी यू सरांनी अध्यक्षीय समारोप केला.
पाहुण्यांचा परिचय प्रा तीगोटे एम एम यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ संध्या वळसंगीकर यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.