कंधार
या प्रसंगी माळाकोळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मानिकराव डोके यांनी आप्पाराव पाटील तोंडचिरे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत, आप्पाराव पाटील तोंडचिरे यांनी अत्यंत मनमिळाऊ, कर्तव्यदक्ष,निस्वार्थी, कार्यतत्परतेने त्यांची सेवा बजावली आहे.
पोलीस पाटील म्हणजे पोलीसांच्या हक्काचा माणुस आसतो. त्यांच्यावर गावचे पालकत्व आसते, हेच पालकत्व आप्पाराव पाटील तोंडचिरे यांनी गंगनबीड सोबतच बाबुळगावचा (2 वर्ष) अतिरीक्त पदभार उत्कृष्ठ पणे सांभाळले आहे. असे प्रतिपादन या वेळी बोलतांना करत त्यांच्या कार्यचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी माळाकोळी पोलीस स्टेशनचे अतुल क्षिरसागर (कॉन्स्टेबल), ईब्राहीम शेख (कॉन्स्टेबल),आनंद पाटील लुंगारे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष कंधार , रामदास गित्ते (सरपंच प्र. बाबुलगाव), प्रकाश गित्ते (पत्रकार), व्यंकटी राहेरकर, बाळु तोंडचिरे, शिवाजी राहेरकर, नागनाथ तोंडचिरे, विश्वनाथ तोंडचिरे,संभाजी पाटील लाडेकर(अ.भा. छावा संघटना तालुका अध्यक्ष कंधार),
संदिप पाटील तोंडचिरे(अ.भा. छावा संघटना तालुका उप अध्यक्ष कंधार), रमेश वंचेवाड, भगवान झंपलवाड, दत्ता फैलवाड,पांडुरंग पानपट्टे,बालाजी राहेरकर,किशनराव डांगे,दिगंबर बैनवाड,संतोष तोंडचिरे,रामराव मध्यबैनवाड.आदीसह नागरीक मोठ्या संखेने ऊपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाष राहेरकर यांनी केले तर आभार. सत्कारमुर्ती आप्पाराव पाटील तोंडचिरे यांनी मानले.