कंधार ; प्रतिनिधी
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगरसेवक शहाजी नळगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच येथे उपस्थित सर्व डॉक्टरांचे स्वागत करण्यात आले.
शिबिरात 187 रुग्ण आले होते त्या पैकी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 31 रुग्णांची निवड झाली आहे व संबंधित 31 लाभार्थ्यांना लवकरच प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.
आता यापुढे सर्कल निहाय दर शुक्रवारी तपासणी दोणार असून 15 जुलै ला रोजी कौठा 22 जुलै रोजी पेठवडज सर्कल असेल व 29 जुलै 2022 रोजी शुक्रवारी कुरुळा,फुलवळ,या सर्कलमधील दिव्यांग रुग्णांची तपासणी व प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ सुर्यकांत लोणीकर यांनी दिली .