कंधार ; प्रतिनिधी
कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांनी जिल्हापरिषद गट निहाय सर्कलची विभागणी करून जनतेच्या सोयीसाठी दिव्यांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी ही मोहीम राबविली तालुक्यातील व शहरातील दिव्यांग नागरिकांना संगणकीय प्रणालीद्वारे बाहादरपुरा ,शिराढोण जिल्हा परिषद गटातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या दिव्यांग लाभार्थ्याची तपासणी व प्रमाणपत्र वितरण समारंभ शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आज दि:-08 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने दिव्यांग व्यक्तीची तपासणी व प्रमाणपत्र वितरण मोहीमचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाचे उदघाटक श्री.शाहूराज भाऊ नळगे नगरसेवक नगरपरिषद कंधार यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच येथे उपस्थित सर्व डॉक्टरांचे स्वागत करण्यात आले.
कंधार तालुक्यातील व शहरातील दिव्यांग लाभार्थी यांनी ऑनलाईन नोंदणी व तपासणी करून घेतली व शिबिराचा लाभ घेतला .
जिल्हा परिषद सर्कल नुसार दि:-08/07/2022 बहादरपूरा,शिराढोण या दोन सर्कल चे रुग्ण तपासणीसाठी कंधार तालुक्यातील व शहरातील एकूण रुग्ण संख्या :-187 रुग्ण आले होते त्या पैकी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 31 रुग्णांची निवड झाली आहे व संबंधित 31 लाभार्थ्यांना लवकरच प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.
बालरोग विभाग:-01 ,अस्थिव्यंग विभाग:-11, मनोविकृती विभाग:-07,औषध वेधक विभाग:-01,नेत्र विभाग:-11 एकूण:-31 अशा विविध प्रकारच्या आजाराचे दिव्यांग रुग्ण आले होते .बाकी तीन सर्कल दर शुक्रवारी दि:-15 जुलै ला कौठा सर्कल असेल आणि 22 जुलै ला पेटवडज सर्कल असेल व बाकी दोन सर्कल 29 जुलै 2022 रोजी शुक्रवारी कुरुळा,फुलवळ,या सर्कलमधील दिव्यांग रुग्णांची तपासणी व प्रमाणपत्र वितरण होईल या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नाव नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवाची ग्रामीण रुग्णालय कंधार येथे तपासणी झाली दि:-08 जुलै 2022 रोजी शुक्रवारी तपासणी करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील फुलवळ,बाहादरपूरा सर्कल मधील दिव्यांग बांधवांना या सुवर्ण संधीचा निश्चितच लाभ होईल.
यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.डॉ.विपीन इटनकर साहेब ,नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक मा.डॉ. निळकंठ भोसिकर साहेब ,मा.श्री.शरद मंडलिक साहेब उपविभागीय अधिकारी कंधार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
यावेळी गट विकास अधिकारी सुदेमांजरमकर साहेब ,चंद्रकांत महाजन, हेमंत सुजलेगावकर
(मंडळ अधिकारी)
दिलीप मदेवार, मधुसूदन नंदमवाड (तलाठी) या शिबिरास डॉ.योगेश जायभाये (नेत्ररोग तज्ञ ), डॉ.स्वप्ना गोळवे,डॉ.देवायुध मुखर्जी, डॉ.विजय कागणे (अस्थिरोग तज्ञ), डॉ.अक्षय जाधव,डॉ.शुधाशूकुमार गौतम, डॉ. वैभव चंदापूरे,डॉ. अनिश ठाकरे ,डॉ. भिषेक कावरा (औषध वेधक),
डॉ.सुधाकर बंडेवाड (बाल रोग तज्ञ ), डॉ. रोहित ठक्करवाड (मनोविकृती तज्ञ),उपस्थित होतसेच नाव नोंदणीसाठी बालाजी चातरवार, संदीप चव्हाण ,प्रदीप पांचाळ, देवेंद्र जोग (समाज सेवक) ,यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले.