नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोशियन च्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी शिवाजीराव पन्नासे यांची नियुक्ती.

नायगाव ; प्रतिनिधी


गडगा तालुका नायगांव येथील लक्ष्मी मेडिकल चे संचालक ज्येष्ठ केमिस्ट शिवाजीराव पन्नासे हे गेल्या २७ वर्षांपासून संघटनेतील प्रत्येक कार्यात सक्रिय सहभागी असतात.
यापूर्वी ते जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा तालुका अध्यक्षपदी नायगांव , बिलोली , धर्माबाद येथुन बिनविरोध निवडून आले होते.
आजपर्यंत केमिस्ट संघटनेच्या प्रत्येक कार्यात सक्रिय सहभाग असल्यामुळे केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोशियन च्या राज्य , जिल्हा स्तरावरील नेतृत्वाने शिवाजीराव पन्नासे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड केली.त्यांची या पदावर निवड झाल्याचे समजताच जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यांच्या निवडीचे पत्र परभणी येथील पाच जिल्यातील केमिस्ट व फार्मासिस्ट कार्यकर्ता मेळाव्यात अखिल भारतीय तथा महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष मा. आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल मा.आ. वसंतराव चव्हाण , भास्कर पा. भिलवंडे, यांच्यासह नायगाव, धर्माबाद, बिलोली, मुखेड , देगलुर , येथील तालुक्याच्या संघटनेनी शिवाजीराव पन्नासे
यांचा सत्कार केला.


या निवडीचे राज्य निमंत्रित कार्यकारिणी सदस्य सदानंद मेडेवार मराठवाडा अध्यक्ष दिपक कोठारी, मराठवाडा उपाध्यक्ष दिपकराव पावडे फार्मसी कौन्सिल राज्य सदस्य रामदेव दाड, जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक मुन्ना जैन, नांदेड जिल्हाध्यक्ष शंतनु कोडगिरे , सचिव संजय मोटे ,जिल्हा उपाध्यक्ष शहर अनिलकुमार तोषणीवल , जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण विवेक देशमुख, कोषाध्यक्ष कुणाल कंदकुर्ते, सहसचिव शहर नितीन गंजेवार , सहसचिव ग्रामीण सुधाकर काळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शहर शमेंद्र हुंडीवाला ,राजेश बुलबुले, लक्ष्मीकांत लोकमनवार , समीर तम्मेवार ,श्रीकांत गुंजकर , अब्दुल बारी हाजी मोहमद युसुफ , सचिन किसवे, रमेश पुरी , सय्यद इक्बाल अहेमद , गिरीश देशमुख.
जिल्हा कार्यकारिणी सदस्य ग्रामीण श्रीधर पाटील चव्हाण (नायगांव) राजाराम गटलेवार (किनवट), रामचंद्र बाळापुरकर (धर्माबाद) , राजेशवर रेड्डी लोकावाड ( भोकर) शंकर देशमुख (उमरी) , विजयकुमार कुंचनवार (बीलोली) , साईनाथ टेकाळे (अर्धापूर) समर त्रिपाठी ( माहूर) शंकर वानखेडे ( हिमायतनगर) , दीपक चालीकवार (कंधार) , बाळानंद गबाळे (मुखेड) , दिनेश मोटे (लोहा), विश्वास देशमुख (हदगाव), विनोद बोडके (देगलुर),बालाजी सुर्यवंशी (मुदखेड) अमित शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील अनेक केमिस्ट बांधवांनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *