सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नागोराव पन्नासे
कंधार:
नायगाव तालुक्यातील गडगा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नागोराव पन्नासे यांचा वाढदिवस जन्मभूमी व कर्मभूमीत मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.आपल्या कार्य कृतत्वातून पन्नासे यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामान्य माणसात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.
कंधार तालुक्यातील कौठा ही जन्मभूमी असलेल्या शिवाजी पन्नासे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लग्नबंधनाच्या गाठी बांधल्यानंतर गडगा येथे स्थायिक झाले.चारित्र्य अन् प्रामाणिकपणा जपून वंदनीय गुरूवर्य राष्ट्रसंत डॉ.शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपाशीर्वादाने आपली दानत्वाची वाटचाल सुरू ठेवली.गुरुमाऊलीचे वेळोवेळी लाभलेल्या गुरुउपदेशाने त्यांची वाटचाल यशस्वी राहीली.
रक्तदान शिबीर, नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराच्या आयोजनातून त्यांनी हजारोंना मायेचा आधार दिला.म्हणूनच गोरगरीबांच्या आशिर्वादाने त्यांची एक मुलगी, दोन मुले शैक्षणिक प्रगतीची उंच शिखरे पादाक्रांत केली आहेत.अशा या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिवाजी पन्नासे यांचा वाढदिवस नूकताच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जि.प.कन्या शाळा कौठा व जि.प.प्राथमिक शाळा पुनर्वसन कौठा येथे कौठा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मा.ग्रां.पं.सदस्य ओम गणेश देशमुख यांच्यातर्फे शालेय साहित्य रजिस्टर व पेन सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच गंगाधर हात्ते होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून बळवंत काकडे उपसरपंच तेलुर, पत्रकार प्रभाकर पांडे,कांतराव हात्ते,नुरुद्दीन सय्यद सर, डॉ.सिध्देश्वर मुद्दे, वसंत मडके,भागवत हात्ते,बबलु पिंजारी,रवि हात्ते यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक बालाजी पवळे, दिलीप चव्हाण, संतोष दिनकर, रामेश्वर बुच्चे,सौ.संजीवनी शिपांळे,सौ.चित्रा लुंगारे,सौ.ललिता मजरे,सौ.चंद्रभागा जाधव,कौठा पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेचे पटलेवार गुरूजी आदींची उपस्थिती होती.