कंधार ; प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठकित राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज पाटील धोंडगे यांनी आपल्या कार्याचा आढावा सादर केला .
आज दि.१२ जुलै रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार ,राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख , छगन भुजबळ , एकनाथराव खडसे , सुप्रियाताई सुळे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती
कंधार लोहा यासह नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नाची व समस्याची सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत सतत संपर्कात राहावे असे आवाहन केले तसेच या कार्य आहवाला बदल कौतूक केल्याची माहीती यावेळी युवानेते शिवराज पाटील धोंडगे यांनी दिली.
दरम्यान माजी मंत्री दत्तामामा भरणे यांची ही सदिच्छा भेट घेतली.