कंधार ; प्रतिनिधी
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने समाजातील गोरगरीब, दुर्लक्षित घटकांना सोबत घेऊन पंढरपूर यात्रा घडवून आणली आहे. त्यांच्या या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
त्यामुळे त्यांची ही पंढरपूरची वारी की जि.प.ची तयारी अशी चर्चा त्यांच्या मित्रपरिवार व समाजातून जोर धरत आहे.
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी बालाजी पांडागळे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून दोन वेळा काँग्रेस श्रेष्ठीकडे तिकिटाची मागणी केली होती. परंतु पक्षाने संधी दिली नाही. तरीही वरिष्ठाचा आदेश मानून नाराज न होता त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहो रात्र पक्षाचे काम न थांबता गाव तेथे शाखा घर तिथे कार्यकर्ता अशा पद्धतीने पक्षवाढी साठी काम केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला आता पक्षाने समाजाची सेवा करण्याची संधी द्यावी अशी कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. यासाठी बालाजी पांडागळे यांचे मित्र मंडळ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची लवकरच भेट घेणार असे यांचे सांगितले जात आहे.