सामाजीक अर्थसहाय्य योजनेच्या कंधार तालुक्यातील 5441 लाभार्थीना दीड कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरण

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुकयातील सामाजीक अर्थसहाय्य अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावण बाळ योजना, इंदीरागांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ/विधवा/दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या 5441लाभार्थीना एप्रिल ते जून या तीन महीन्याचे अर्थसहाय्य तहसिल कार्यालयाकडून दि.13 जुलै 2022 रोजी पोस्ट व बॅकेंना वितरीत करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

कंधार तालुक्यात आज रोजी संजय गांधी निराधार योजनेचे सर्वसाधारण प्रवर्गाचे -1801,अनुसूचीत जातीचे-714,अनू.जमातीचे-47 लाभार्थी असून श्रावण बाळ योजनेचे सर्वसाधारण प्रवर्गाचे -1850,अनुसूचीत जातीचे-992,अनू.जमातीचे-37 लाभार्थी आहेत व केंद्र व राज्य संयुक्त अनुदान असलेल्या इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ/विधवा/दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेचे- 1108 लाभार्थी आहेत. या सर्वाना एकुण रुपये 15758700/- एवढे अनुदान आज वितरीत केले आहे..

इंडीयन पोस्ट पेमेंट बॅक,स्टेट बॅक ऑफ इंडीया,महाराष्ट्र ग्रामीण बॅक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक,आय.डी.बी.आय. बॅकेद्वारे सर्व लाभार्थीना अनुदान वाटप करण्यासाठी पाठविण्यात आले. सर्व बॅक/पोस्ट यांनी तात्काळ अनुदान वितरीत करावे असे मा तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी कळविले आहे.

अर्थसहाय्य वेळेवर लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यासाठी मा तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजना विभागाचे प्रमुख तथा नायब तहसिलदार श्री संतोष कामठेकर, पेशकार अविनाश पानपट्टे, संगांयो शाखेचे महसूल सहाय्यक बारकुजी मोरे यांनी काम पाहीले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी विभागाच्या प्रमुख तहसिलदार ज्योती चव्हाण महसूल सहाय्यक माधुरी शेळके यांनी वेळेवर आवश्यक ते अनुदान व मार्गदर्शनासह पाठपुरावा केला तर उपकोषागार vअधिकारी कंधार सुनीता नरवाडे व कोषागारातील कर्मचारी यांनी तात्काळ देयके मंजूर केली.

तरी लाभार्थी बॅक पोष्टात जाऊन अधिकृत कर्मचारी यांच्याकडून अर्थसहाय्य तपासून घ्यावे व पावती घ्यावी असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात येत आहे

तहसिल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही खासगी व्यक्ती,सिएससी,सीएसपी नेमणूक अनुदान वाटप करण्यासाठी करण्यात आलेली नाही त्यामुळे आय सी सी आय बँकेचे जुने सिएसपींचा तहसिल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंध नाही सदर बॅककडे अनुदान पाठविणे जुन 2020 पासुन बंद केलेले आहे त्यामुळे लाभार्थींनी अधिकृत बॅक/पोस्ट कर्मचारी/अधिकारी -पोस्ट बँकेत जाऊनच अनुदान उचलावे असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात येत आहे

राज्य शासनाने सर्व योजनांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे परंतु संजय गांधी निराधार योजना अनूसुचीत जमातीच्या 47 लाभार्थींना फक्त एप्रिल -एक महीन्याचेच अनुदान उपलब्ध झाले आहे त्यामुळे त्यांना एकच महीन्याचे अनुदान खात्यावर जमा होईल.उर्वरित दोन महिन्यांचे अनुदान उपलब्ध करून घेण्यासाठी तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन पाठपुरावा चालू आहे

तसेच केंद्र पुरस्कृत योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थींना राज्य सरकारकडून तीन महीन्याचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे परंतु केंद्र सरकारच्या वाटयाचे अनुदान उपलब्ध झाले नाही. त्या करीताही तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन पाठपुरावा चालू आहे या लाभार्थींना पि.एफ.एम.एस.प्रणाली द्वारे वरुनच अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्याची शक्यता आहे तेव्हा केंद्र पुरस्कृत योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ /विधवा / दिव्यांग योजनेच्या लाभार्थींना राज्य सरकारकडून तीन महीन्याचे प्रत्येकी 2100/-,2400/-2700/- एवढे अनुदान खात्यावर जमा करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *