गडगा (प्रतिनिधी)कै. सुमनबाई तुकाराम मंगनाळे टेंभुर्णीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेंभुर्णी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना (रजिस्टर व पेन) शालेय साहित्याचे मंगनाळे कुटुंबीयांच्या वतीने वाटप करण्यात आले.
टेंभुर्णी येथील रहिवाशी व सेवादास ज्युनिअर कॉलेज चे निवृत्त प्राचार्य श्री तुकाराम मंगनाळे यांच्या पत्नी कै.सुमनबाई तुकाराम मंगनाळे यांच गेल्या वर्षी अचानक दुःखद निधन झाले होते.पत्नीच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ईत्तर रितीरिवाजाला तिलांजली देत समाधीचे पुजन करून अभिवादन केल्यानंतर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत प्रथम पुण्यस्मरण दिन सामाजिक उपकृमांनी साजरा करुन निवृत्त प्राचार्य तुकाराम मंगनाळे सर यांनी इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे.याच कार्यकृमात डॉ.संदीप मंगनाळे यांचे चिरंजीव स्वराज मंगनाळे हा बारावीत विषेश प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंदराव आमलापुरे, निवृत्त प्राचार्य तुकाराम मंगनाळे सर,उत्तमराव मंगनाळे, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन श्री राजेश्वरराव मंगनाळे, डॉ.संदीप मंगनाळे, सुनील मंगनाळे, श्याम मंगनाळे,
प्रल्हाद मंगनाळे, प्रकाश मंगनाळे, टेंम्बलवर सर, कंधारे सर, वाडीकर सर वडजे सर, सूर्यवंशी सर, पवार सर, कुराडे सर, कापसे मॅडम, तेलगाणे मॅडम उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन टाकळे सर तर आभारप्रदर्शन शहाजी मंगनाळे यांनी केले.