नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेत अनुक्षाचे यश 

 नांदेड  –   केंद्रीय परीक्षा मंडळाकडून घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश  पात्र परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात अनुक्षा मनोजकुमार साखरे ही विद्यार्थिनी प्रवेश पात्र परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिची जवाहर नवोदय विद्यालय सन 2022 साठी निवड झाली आहे.    

            दोन महिन्यापूर्वी 30 एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालय केंद्रीय परीक्षा मंडळाकडून इयत्ता सहावी प्रवेश पात्रतेसाठी परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेत शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, पासदगाव ता. जि. नांदेड या शाळेची विद्यार्थिनी कु. अनुक्षा मनोजकुमार साखरे हिने यश संपादन केले आहे. यासाठी तिला शाळेचे मुख्याध्यापक श्री. विक्रम ढोणे सर श्री. श्रीनिवास बिरादार सर तसेच विजडम अकॅडमी चे संचालक श्री. संतोष शिरसे सर व सय्यद सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.   तसेच तिच्या यशात तिचे आई-वडील आजी-आजोबा यांचाही निश्चित वाटा आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *