पहिल्या मंत्रिमंडळाने स्वीकारलेलं राष्ट्रीय शिल्प नाकारणे, एक षडयंत्र – पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) प्रधानमंत्री मोदी यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवलेले हिंस्त्र शिल्प (अशोक स्तंभ) हे एक षडयंत्र असून मोदी सरकारची मनुवादी मानसिकता दिसून येत आहे यामुळेच मूळ येतिहासिक राष्ट्रीय शिल्पा चे विडंबन करण्यात आल्याचे मत् रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रिय् महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

नव्याने बनवण्यात आलेले शिल्प हे राष्ट्रीय शिल्प नसून शांत व संयमी सिंहाला हिंस्र रूप देऊन प्रधानमंत्री मोदी यांनी राष्ट्रीय शिल्प अशोक स्तंभाचे विडंबणं केले आहे. मूळ राष्ट्रीय चिन्हा सोबत विकृती करणाऱ्या संकल्पने ची, कृती, प्रवृत्ती, व्यक्ती आणी विचारसरणी ची किव करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या घटनेचा जाहीर शब्दात निषेध करण्यात येत असल्या चे ही डॉ. माकणीकर म्हणाले.

1950 दि 26 जानेवारी ला भारताच्या तत्कालीन सरकारने सम्राट अशोकाने सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभा वरील “सिंह शीर्ष” स्वतंत्र भारताची राष्ट्रीय मुद्रा म्हणून स्वीकारली. हे शिल्प तथागत भगवान बुद्ध जीवनाशी निगडित शांत आणी संयमी व स्वतंत्र सिंह हे धम्माचे प्रतिक मनुवादी मेंदूला पटले नसल्याने सत्तेत येऊन बौद्ध व राष्ट्रीय शिल्पाचे विडंबन करून इतिहास पुसण्याचे काम प्रधान मंत्री मोदी यांनी यांनी केले आहे यामुळे सदर चा प्रकार रोकण्यासाठी सर्व स्तरातून प्रतिकार करण्याचे आवाहन सुद्धा डॉ. माकणीकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *