कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवराज पाटील धोंडगे यांच्यावर विशेष जबाबदारी पक्षाने सोपवली आहे . त्यांची यवतमाळ उमरखेड विधानसभा निरीक्षक पदी सुपर १०० मध्ये निवड करण्यात आली आहे .
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा निरीक्षक यादी’ जाहीर करण्यात आली आहे! राज्यातील १०० विधानसभा मतदारसंघात ‘सुपर १००’ ही संकल्पना राबवत पक्ष मजबुतीचे काम करण्यात येणार आहे.

आदरणीय शरद पवार यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जात काम करण्याचे आश्वासन यावेळी शिवराज पाटील धोंडगे यांनी या निवडी प्रसंगी दिले आहे .


