नांदेड ; दिगांबर वाघमारे
शिक्षकांनी याचा नियमित वापर करावा व शाळेच्या गुणवत्तेत वाढ करावी असेही त्या म्हणाल्या . याच सोबत मुलींच्या उपस्थिती व गळती बाबत सविस्तर अभिलेखे पाहून शाळेतील इतर उपक्रमाचेही कौतूक केले.
ग्रामीण भागातील एक सुंदर व उपक्रमशील शाळेबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी गावचे सरपंच प्रतिनीधी मा.विनायक पा.काळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.बालाजी पा.कल्याणकर, तंटामुक्ती अध्यक्ष मा.शंकरराव काळे ,चेअरमन माधवराव पा.भवर केंद्रप्रमुख टी.पी.पाटील सर यांनी सौ.वर्षा ठाकूर यांचा व शिक्षणाधिकारी साहेबांचा शाल व पुष्पगुच्छा देवून सत्कार करण्यात आला.तर
शाळेच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रविण पाटील यांचे ज्ञानदीप हे पुस्तक मान्यवरांना भेट देण्यात आले.
यावेळी मारतळा केंद्राचे केंद्र प्रमुख मा.पाटील टी.पी.सर , शाळेचे मु.अ.व सर्व शिक्षक उपस्थित होते.यावेळी राजमाता जिजाऊ ग्राम विकास कृतीदलाचे सचीव मा.विकी भवर व अनेक शिक्षण प्रेमी नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.