कंधार
कंधार तालुक्यात मागील आठवडा भरापासून तालुक्यामध्ये व परिसरामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या पाच दिवसापासून सुर्यदर्शन झाले नाही .सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांसाठी कठीण परिस्थीती निर्माण झाली आहे. पिक नष्ट होण्याच्या मार्गावर झाले आहेत. त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले
नैसर्गिक संकटामुळे आर्थीक नुकसान होऊन शेतक-याना आर्थीक संकटांचा सामना करावा लागत आहे.
तरी तहसिल प्रशासनाने तात्काळ अतिवृष्टीग्रस्त
शेतकऱ्यांच्या पिकाचे मंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत द्यावी. असे निवेदनाद्वारे मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कंधार तालुकाध्यक्ष
आनंद- पाटील लंगारे ,
श्रीराम पाटील वडजे ,
विष्णुकांत पाटील जाधव ,
मारोती पाटील गवळे, एकनाथ शिवाजी चोंडे, सोपान पाटील लाडेकर, किरण पाटील वडजे, साई पाटील शिंदे, रघुविर पा. वडजे, आदी सर्व पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी केली आहे .