डॉ.भाई केशवराव धोंडगे


एक अफलातून नेता… तब्बल पस्तीस वर्षे एकतर्फी तालुक्याचे नेतृत्व केले… पांच वर्षे खासदार तर तीस वर्षे आमदार राहण्याचा मान त्यांना मिळाला…सतत विरोधी बाकावर बसणारे केशवराव यांना दस्तुरखुद्द स्व. इंदिरा गांधी यांनी काँग्रेस मध्ये आमत्रण दिले नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद बहाल करण्याचा शब्द दिला पण ह्या मन्याड खोर्‍यातील वाघाने त्यास लाथाडले…ह्या स्वावलंबी नेत्यांचे विरोधी पक्ष कसा असावा अन विरोधी पक्षनेता कसा असावा ह्याच उदाहरण आजही विधानसभेत घेतले जाते…शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व करताना त्यांची आदोंलन व सत्याग्रहाची धास्ती खुप असायची…

त्यांच्या काळात भ्रष्टाचार करण्याची हिंमत कुणात नव्हती… एका महसुल अधिकाऱ्यांने एका ग्रामस्थांला कामासाठी लाच मागितली ही बाब केशवरावांना समजली लगेच वाजत गाजत कोंबडी, दारू आणी टोपलभर शेण घेउन मोर्चा कार्यालयात पोंहचले तर अधिकाऱ्यांची उडालेली भबंरी अखेर सबंध आंदोलनकर्त्यांपुढे त्या अधिकाऱ्यांने दिलगिरी व्यक्त केली आजही ज्येष्ठ नागरिक विनोदात सांगतात…

विधानभवनात शेवटच्या बेंचावर बसणारे केशवराव जेव्हा बोलायला उठायचे तेव्हा मात्र त्यांचे बोलण ऐकण्यासाठी सबंध सभागृहात शांतता असायची… विशेष म्हणजे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी समरस होते…ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मित्र होते…. बाळासाहेबांचे भाषण विधानसभेत व्हावे म्हणून त्यांनी मागणी केली.. सत्ताधारी काँग्रेसने विरोध केला पण केशवरावांनी तो डाव हाणून पाडला अन बाळासाहेब विधानसभेत गरजले..

एकदा असच इंग्लंडच्या महाराणी एलजाबेग भारतात येणार होत्या… त्यांचा महाराष्ट्रीयन पध्दतीने स्वागत करण्याचे ठरले…त्यात नथ, नऊवारी साडी, चोळी, काकण देण्याचं ठरविण्यात आले… तेव्हा यावर केशवरावांनी विनोदी आक्षेप घेत विचारले अध्यक्ष महाराज राणीसाहेबाना नथ घालण्यासाठी नाकाला भोक आहे का ? सभागृहात हस्या पसरला.. आता सभागृहाने भोक ह्या शब्दाला आक्षेप घेतला पण ऐकतात ते केशवराव कसले… त्यानी आपल्या बोलण्यात सर्वाकडून ते मंजूर करून घेतले… आज केशवरावांनी शंभरी पार करत १०२ कडे आगेकूच करत आहेत तरीही ना चष्मा ना हातात काठी बोलणं कणखर आजही कुणाची तमा न बाळगता समोरच्याला उतर देतात… ना घमेंड… विशेष म्हणजे इतक्या वयानंतर येणाऱ्या कार्यकर्त्यास नावानिशी बोलतात..हा नेता यापुढे होणार नाही… कधी घमेंड नाही.. चुकलं तिथं राजरोसपणे दिलगीरी व्यक्त करतील अन पुढच्याच चुकले तर तमा न बाळगता आपलं मत व्यक्त करणार… विशेष म्हणजे आजही ते आपुलकीने चुंबन घेतात मग ते व्यासपीठावर असो ह्या सार्वजनिक ठिकाणी आपली निखळ माया व्यक्त करताना त्यांना कुठलाच भेदभाव नसतो… अश्या माझ्या आवडत्या नेत्यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा…
मानाची जयक्रांती…
मानाचा जय महाराष्ट्र…

||| गणेश कुंटेवार ||||
कंधार – ९४२३७०५३८८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *