यवतमाळ ; प्रतिनिधी
भारत स्काऊट्स अँड गाईड्स जिल्हा कार्यालय आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 जुलै 2022 रोजी तालुकाप्रमुख सहविचार सभा व राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण सोहळा चे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रामुख्याने प्रमोद सूर्यवंशी शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त,
श्री राजू मडावी उपशिक्षणाधिकारी, श्रीमती प्रणिता गाढवे शिक्षण विस्तार अधिकारी, श्रीमती स्मिता घावडे , श्रीमती संध्या शेटे शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक,श्रीमती शीतल कडू विशेषतज्ञ, श्री इंगोले गटशिक्षणाधिकारी पांढरकवडा , डॉक्टर ललिता जतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.
याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट व गाईड यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नवजीवन विद्यालय पुसद,रेड्डी कॉन्व्हेंट पाटणबोरी, सुदाम विद्यालय धोत्रा, स्वर्गीय देवराव पाटील विद्यालय वडगाव, यवतमाळ,चिंतामणी विद्यालय कळंब, विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मारेगाव, सैनिक पब्लिक स्कूल वडकी राळेगाव या शाळेतील स्काऊट गाईड यांना राज्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सदर सभेचे अध्यक्ष श्रीमती प्रणिता गाढवे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कविता पवार जिल्हा संघटक गाईड यांनी केले तर प्रास्ताविक श्री गजानन गायकवाड जिल्हा संघटक स्काऊट यांनी केले.
सदर सभेची सुरुवात लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार,दीप प्रज्वलन व
दया कर दान भक्ती का
प्रार्थनांनी सुरुवात झाली. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे गेली 40 वर्षापासून स्काऊटींग मध्ये अविरत कार्य करत असलेले परंतु कोरोना महामारी मध्ये देहांत पावलेले श्री मधुकर विंचुरकर कळंब,श्री विष्णुदास चव्हाण दिग्रस, श्री महेश पठाडे मारेगाव,यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याच प्रमाणे नुकतेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये ALT प्रशिक्षण यशस्वीरीच्या पूर्ण केल्याबद्दल श्री गजानन गायकवाड व श्री दिनेश घाटोळ यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. श्री रमेश बोबडे तालुकाप्रमुख झरी यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. श्री गुणवंत गांजरे यांचा सेवा गौरव पदक देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने 16 ही तालुक्यातील तालुका प्रमुख कब मास्टर व स्काऊट मास्टर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयाचे कर्मचारी कनिष्ठ लिपिक श्री सुरज गोईकर श्रीमती हेमलता वाडिवे, कुमारी दिशा शिंगारकर,साजिद मंसूरी यांनी परिश्रम घेतले.