नांदेड भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय

अलविदा नांदेड


मागच्या वर्षी 17 ऑगस्ट 2021 रोजी नांदेड भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय मध्ये जिल्हा संघटक पदाचा पदभार स्वीकारला..


माझे मूळ गाव केंद्रेवाडी हे लातूर जिल्ह्यात जरी असले तरी नोकरीच्या निमित्ताने माझ्या वडिलांनी अख्ख आयुष्य नांदेडमध्ये व्यतीत केलं..
माझा जन्म देखील नांदेड जिल्ह्यातच झाला.. माझं संपूर्ण शिक्षण बालवाडी ते महाविद्यालयीन हे सगळं नांदेडमध्येच पूर्ण झालं खऱ्या अर्थानं नांदेड माझी जन्मभूमी म्हणून या जिल्ह्यात नोकरी करण्याची संधी मिळाली याचे विलक्षण प्रेम माझ्या मनी होतं..


ज्या स्काऊट गाईड कार्यालयाकडे लहानपणापासून मी पाहत होतो, ज्या ठिकाणी आमची जडणघडण झाली आणि ज्या कार्यालयामुळेच राष्ट्रपती पदक पर्यंत आम्हाला झेप घेता आली त्याच कार्यालयामध्ये एक प्रोफेशनल म्हणून काम करण्याचं आव्हान समोर होतं..


येथील सर्व चळवळीत कार्य करणारे कार्यकर्ते पदाधिकारी हे परिचित होते म्हणून खूप काही ठरवलं होतं येणाऱ्या कार्यकालामध्ये नांदेडला स्काऊट गाईड चळवळीमध्ये महाराष्ट्राच्या नकाशावर वरच्या ठिकाणी नेऊन ठेवण्याचा मानस होता..
त्या दृष्टीने वर्षभर कामाची सुरुवात देखील केली, यात सगळ्यात अगोदर तालुका निहाय चर्चासत्राच्या माध्यमातून नव्याने आलेला बिगीनर्स कोर्स जोमाने सुरू केला..
प्रत्येक तालुक्यावर प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी बैठकांच आयोजन केलं एक नवचैतन्य चळवळीला निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सारखणीसारख्या दुर्गम भागात जाऊन आदिवासी शाळांना भेटी दिल्या. जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिराचे आयोजन करून त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा देखील सहभाग नोंदविला. चतुर्थ चरण, हीरक पंख यादेखील चाचण्या संपन्न केल्या.. पथक नोंदणी साठी देखील अविरत प्रयत्न केले.


कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यावर्षी शाळा उशिरा सुरू झाल्या. कोविड महामारीचे भूत सगळ्यांच्या मानगुटीवर होतं तरी देखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्य करण्याचा प्रयत्न केला.
पण कोविडच्या प्रादुर्भावामुळे कार्य करण्यामध्ये मर्यादा येऊ लागल्या पण एक निश्चय केला की येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये जोमाने कार्याला लागू या… आणि पुनश्य हरिओम करूया… त्या दृष्टिकोनातून कार्यालयामध्ये वर्षभरात प्लॅनिंग केलं परंतु कदाचित नियतीला हे मान्य नसेल योगायोगाने माझी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स गाईड्स राज्य कार्यालय मुंबई येथे सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त या पदी पदोन्नती झाली. एकीकडे पदोन्नती चा आनंद होता परंतु एका बाजूने स्वतःच्या जन्मभूमी मध्ये कार्य म्हणावं तेवढं करता आलं नाही याचं शल्य होत..


यादरम्यान मला कार्यालयाच्या मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती सविता बिर्गे मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक आदरणीय आमचे मार्गदर्शक श्री प्रशांतजी दिग्रसकरसर, उपशिक्षणाधिकारी श्री दिलीप बनसोडे सर ,श्री सलगर सर, श्रीमती मांदळे मॅडम ,जिल्हा कार्यालयाच्या माझ्या सहकारी श्रीमती शिवकाशी तांडे मॅडम, जिल्हा कार्यालयाची जुने संघटन श्री करंडे सर, श्री कुदळे सर, मानद पदाधिकारी श्रीमती भागीरथी बच्चेवार मॅडम, श्री प्रलोभ कुलकर्णी सर, श्री नागोराव टिप्पलवाड सर, श्री हेमंत बेंडे सर, श्री फुलारी सर, श्री तोरनेकर सर, श्रीमती मीनाक्षी झाडबुके मॅडम, माझा सहकारी श्री कैलास कापवार, श्री परमेश्वर बनसोडे, श्री साईनाथ, श्री संजय गुडलावार, श्री दत्तकुमार धोतडे, श्री भोळे सर, श्रीमती निलेवार मॅडम, श्रीमती नळगिरे मॅडम, डॉक्टर पाटोदेकर सर, श्री भालके सर, गटशिक्षणाधिकारी श्री पोले सर, श्री सोनटक्के सर, श्री महामुनी सर, श्री कदम सर, सन्माननीय मठपती सर, तंत्रस्नेही शिक्षक श्री संतोष केंद्रे सर मुख्याध्यापक संघाचे श्री मोतीभाऊ केंद्रे, श्री संदीप पाटील बेटमोगरेकर, महिला कॉलेजचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी धर्माधिकारी सर, आदरणीय बालाजी
मध्येवाड, माझे मित्र श्री संजय आल्लेवाड, श्री माधव पचलिंग ,श्री उल्हास जोशी, डॉक्टर उदय जोशी, श्री रविराज नवहारे, डॉक्टर सोमनाथ पचलिंग, श्री महेश रेगुडे, श्री साईनाथ बोंधकुले, श्री विश्वनाथ बडूरे, श्री बापूराव बडूरे आदींचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो..
याशिवाय ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या मला सहकार्य केले त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो..
येणाऱ्या कार्यकालामध्ये नांदेड जिल्ह्याच्या उन्नतीसाठी जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन,

सर्वांना माझा सादर नमस्कार…
आपला

गोविंदउत्तमराव केंद्रे

सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *