स्वराज डांगे यांचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश

प्रतिनिधी, कंधार

तालुक्यातील मानसपुरी येथील महारुद्र माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ५ वर्गातील विद्यार्थी स्वराज डांगे यांनी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पूर्व परीक्षेत जिल्ह्यात व्दितीय व कंधार तालुक्यात प्रथम येऊन घवघवीत यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल महारुद्र माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव पांडागळे, मार्गदर्शक रामराव पांढरे, शिक्षक प्रदिप कल्हाळे, अशोक गुट्टे, हालबांगडे मॅडम, भास्कर नळगे, डॉ.यशवंत तेलंग, डॉ.कैलास फाजगे, डॉ. लक्ष्मण जायभाये, पत्रकार तथा स्वच्छतादूत राजेश्वर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते परशुराम केंद्रे, गजानन तोल्डी, ज्ञानेश्वर तेलंग, पंजाब जोगदंड, प्रमोद शेंडगे, राहुल मस्के आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वराज डांगे यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील अण्णा डांगे, आई सौ. प्रतिमा डांगे व शाळेतील शिक्षकांना दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *