उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार भाजपा वतीने हुतात्मा काळे स्मारकात वृक्षारोपण

कंधार ; प्रतिनिधी

भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथील हुतात्मा स्मारक व कै शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान येथे भाजपा च्या वतीने महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्रक्षारोपन करण्यात आले.


भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी कंधार शहरात भाजपाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हा बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात .

यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपा च्या वतीने जि.प. सदस्या प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांच्या हस्ते कंधार येथील हुतात्मा स्मारक व कै शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान येथे व्रक्षारोपन आणि उद्यानात साफ सफाई करण्यात आले.


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्या सौ. प्रणिताताई देवरे -चिखलीकर, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा सौ चित्ररेखा गोरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगीरे, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, मधुकर डांगे , युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,

शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, सुनंदा वंदे, कल्पना गिते, वंदना डुमने, गोरे,व्यंकट नागलवाड, अविनाश गिते, कैलास नवघरे, प्रकाश घोरबांड,राजु लाडेकर,आसेफ शेख, प्रकाश गोरे,रजत शहापुरे , दैवशाला गोरे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *