कंधार ; प्रतिनिधी
उपक्रम सूरु झाल्यापासून पासून तत्कालीन मुख्याध्यापक संभाजीराव कोनाळे दरवर्षीच सहभागी होवून उपक्रम यशस्वी करत असत .
कोरोना महासंकट संपल्यानंतर मुख्याध्यापक गोविंदराव कौसंल्ये यांनी या उपक्रमास अनुमती देवून हा पुर्वीसारखा राबवून सहकार्य केले.त्यांना विद्यालयाचे आदर्श शिक्षक व कविराज, अभिनयकार प्रणित कुमार आनकाडे व सर्व विद्यालयातील आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु-भगीनींनी सहकार्य केले.
यात विद्यालयातील शालेय भगीनींनी या रक्षाबंधन सणानिमित्तच्या स्फूर्तिदायक उपक्रमातून आपल्या भारतीय सैनिक बंधुराजांना सदिच्छा पत्र व राख्या पाठविण्यात आपली इच्छा प्रदर्शित करुन उत्स्फूर्त प्रतिसाद देत सदिच्छा पत्राचे लेखन करुन आपली देशभक्ती दाखवली.
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार च्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले .