कंधार
मागील दोन वर्षापासून कोरोना काळामुळे महाराष्ट्राचे गोर गरिबाचे आराध्य दैवत भाविकांना पंढरपूर दर्शनासाठी खंड पडला होता. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भाविकासाठी पंढरपूर यात्रा स्पेशल सुविधा केल्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूर यात्रेला गेलेत यामध्ये कंधार आगाराने नांदेड जिल्ह्यात अव्वल कामगिरी केली असून सर्वाधिक किलोमीटर व उत्पन्नात प्रथम कामगिरी झाली आहे.
आषाढी पंढरपूर यात्रा कंधार आगारातील यात्रा कालावधीसाठी दिनांक ५ जुलै पासून ते १६ जुलै पर्यंत कंधार ते पंढरपूर यात्रा स्पेशल भाविकासाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये २८४ फेऱ्या १२० चालक वाहकाने कामगिरी केली यामध्ये मोठे प्रवासी १८,४४२ ज्येष्ठ नागरिक ७,३९८ तर लहान प्रवासी ६१९ असे २६,४५९ भाविक भक्तांना कंधार आगारातून पंढरपूर यात्रे पंढरपूर यात्रेचे दर्शन घडून दिले. या कालावधीत ८१,५३४ किलोमीटर तर सवलती मूल्यासह ३२ लाख ९४ हजार १८२ रुपये चे उत्पन्न कंधार आगाराला मिळाले.
नगदी २७ लाख रुपयाचे उत्पन्न कंधार आगाराने घेऊन जिल्ह्यामध्ये कंधार आगार किलोमीटर व उत्पन्नात प्रथम कामगिरी केली आहे. यासाठी कंधार आगाराचे चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे आगाराला पूर्वीचे चांगले दिवस आले आहे. त्यामुळे कंधार आगाराला पंढरपूर पावले असे दिसून येत आहे.
आगाराचे सर्वाधिक उत्पन्न व किलोमीटर केलेल्या कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट रोजी त्यांचा योग्य ते बक्षीस देऊन त्यांना सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख अशोक चव्हाण यांनी दिली आहे.