गंगोत्री चेतन केंद्रे हिने सीबीएसई दहावी परीक्षेत ९९.२० टक्के गुण घेवून केले घवघवीत यश संपादन

कंधार ; प्रतिनिधी

सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल आज दिनांक 22 जुलै रोजी जाहीर झाला असून नांदेड येथील नागार्जुना पब्लिक स्कूल येथील विद्यार्थिनी कु. गंगोत्री चेतन केंद्रे हिने ९९.२० टक्के गुण घेत शाळेतून प्रथम येत घवघवीत यश संपादन केले आहे .

सीबीएसई बोर्ड दहावी परीक्षा एप्रिल ते मे २०२२ दरम्यान घेण्यात आली होती . आज त्या परीक्षेचा निकाल संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे .

नागार्जुन पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शायला पवार
यांच्या व येथील नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि आजोबा संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा डी . एन . केंद्रे आजी कोषाध्यक्षा मुक्ताबाई केंद्रे ,यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केलं अशी प्रतिक्रिया यावेळी कु. गंगोत्री ने दिली .

गंगोत्री चेतन केंद्रे ही संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव चेतनभाऊ केंद्रे व कंधार नगरपालीकेच्या माजी नगराध्यक्षा सौ अनुसया चेतन केंद्रे यांची ती मुलगी होय .

कु गंगोत्री च्या यशाबद्दल . नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर चे संस्थापक अध्यक्ष संभाजी पाटील केंद्रे , जि.प. सदस्य प्रविण पाटील चिखलीकर ,
भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर , लातूर जि.प चे माजी सदस्य चंदन पाटील नागरगोजे , शासकीय रूग्णालय पुणे येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ . केशव गुट्टे , डॉ. अर्चना गुट्टे ,महात्मा फुले विद्यालय शेकापूर येथील प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे , सचिव शिवाजी केंद्रे ,महात्मा फुले विद्यालय कंधारचे मुख्याध्यापक जनार्धन केंद्रे ,संत गाडगेबाबा विद्यालय सोमठाणा चे मुख्याध्यापक धोंडीबा नागरगोजे , महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधारचे मुख्याध्यापक वाघमारे डी . जी .आदीसह शिक्षक ,नातेवाईकाकडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *