कंधार ; प्रतिनिधी
ग
शिवाजीनगरातील सुंदर अक्षर कार्यशाळेचा देशभक्तीमय उपक्रम दरवर्षीच राबवला जातो.गेल्या आठ वर्षां पासून अखंडीत ३३३३ सदिच्छा पत्र व ३३३३ राख्या सोबत १५ फुट लांबीची विशालकाय राखी भारतीय शूर जवानांना पाठविण्यात अग्रेसर असते.या वर्षी बाबा जाधव सर यांची टाॅपर अकॅडमी ही मन्याड खोर्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित विषय शिकविण्याची जणू संजिवनी वाटते.
या टाॅपर अकॅडमी कंधार
यांनी अनोखा सहभाग नोंदवत, भारतीय सैनिकांना सदिच्छासंदेश शालेय भगिनींनी समर्थ हस्ते इंग्रजी भाषेत सुंदर लेखन करुन अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन सणानिमित सदिच्छापर संदेश लेखन करुन मन्याड खोर्यात एक आगळा-वेगळा रक्षाबंधनाच्या आपल्या भारतीय सैनिकांना देत आपले कतृव्य भारत मातेचे रक्षण करत बजावणाऱ्या शूर जवानांना राखी पाठवून भगीनींनी राष्ट्राप्रती आपली सद्भवाना पाठवत सैनिक स्वतःच्या परिवारापासून कोसोदूर राहून एकलकोंडे सीमेवर ऊन,वारा,पाऊस,थंडी याची तमा न करता डोळ्यात तेल घालून दिन-रात सेवेत मग्न राहत असल्यामुळेच देशवासीय आपापल्या गावात अन् घरात सुखी-समाधानी राहतो.
टाॅपर अकॅडमी कंधारचे संचालक आदरणीय गुरुवर्य नारायणराव (बाबा)जाधव सर आणि त्यांच्या शिषोत्तम विद्यार्थ्यींनींचे मनस्वी आभार!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार