कंधार ; प्रतिनिधी
जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला ढगफुटी झाली त्यामुळे कंधार तालुक्यातील नदीकाठच्या भागांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या खरडून वाहून गेली आहे, हाती येणारे पीक पावसामध्ये वाहून गेले आहे एवढेच नाही तर अनेक गावांशी संपर्क करणारा पूल रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत, आणि या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी व ज्या गावचे फुल वाहून गेले आहेत रस्ते वाहून गेले आहेत त्या ठिकाणी पुनर्निर्मिती करावी अशी मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी भाजप विमुक्त आघाडीचे सरचिटणीस तथा वसंतराव नाईक विकास महामंडळाचे संचालक देविदास भाऊ राठोड यांची उपस्थिती होती