अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीचे फ्रेश व रिन्यूअल अर्ज भरण्यास सुरुवात

नांदेड ; प्रतिनिधी

    सन 2022- 23 करिता अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीचे फ्रेश व रिन्यूअल अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. रिन्यूअल अर्ज भरावयाच्या विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

  तरी सर्वप्रथम आपल्या शाळेतील रिन्यूअल विद्यार्थ्यांची यादी काढून त्या विद्यार्थ्यांचे रिन्यूअल फॉर्म भरावेत व या यादी व्यतिरिक्त आपल्या शाळेत शिक्षण घेत असलेले अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व या शिष्यवृत्तीचे अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे फ्रेश अर्ज भरावेत.

   तसेच नोडल ऑफिसर लॉगिन करून सर्वप्रथम नोडल ऑफिसर प्रोफाइल अपडेट करून घ्यावी गेल्यावर्षी केलेली असेल तरीसुद्धा या वर्षी पुन्हा करावी.

विलंबास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर (माध्यमिक; प्राथमिक)
जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *