कंधार
देशाचे रक्षण करण्यासाठी घरापासून कोसो दूर राहणाऱ्या भारतीय सैनिकांना रक्षाबंधन सारख्या बहिण भावाच्या पवित्र सणाला हजर राहता येत नाही हा धागा लक्षात घेऊन गेल्या आठ वर्षापासून कलाशिक्षक दत्तात्रेय एमेकर हे सैनिकांसाठी शुभेच्छा संदेश व राख्या पोस्टाने पाठवतात
कंधारसह नांदेड जिल्ह्यातील शाळेतून विद्यार्थिनी शुभेच्छा संदेश लिहून त्याचे संकलन केले जाते .
आज कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत भारतीय सैनिकांसाठी रक्षाबंधन शुभेच्छा संदेश लिहिण्यासाठी इयत्ता पहिली ते चौथी वर्गाच्या चिमुकल्या मुलींनी सहभाग नोंदवला व आपल्या चिमुकल्या हाताने भारतीय सैनिकांना शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी जी शिक्षिका कागणे यु एम .
बालकताई चंद्रकला तेलंग , आनंद आगलावे , राजू केंद्रे आदींनी परिश्रम घेतले .

