लोहा
आमदार शिंदे यांनी दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना सांगितले की शेतकऱ्यांचे जे अतिवृष्टी आणि पावसामुळे शेतीचे नुकसान झालेलं आहे. त्या सर्व शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करण्यात यावेत. तसेच रोडच्या संदर्भात व पुलाच्या संदर्भात सुद्धा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच लाईटच्या संबंधात शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना लाईटच्या संदर्भात हेळसांड होता कामा नाही. अशा प्रकारे सूचना लाईट विभागाच्या अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच लोहा,कंधार तालुक्यामधील जे अवैध दारू, गुटखा,मटका,गुडगुडी जे चालू आहे. त्या संदर्भात सुद्धा कार्यवाही करण्यास सूचना करण्यात आल्या. मतदारसंघातील गोरगरीब,पीडित,शोषित,वंचित, दलित,अपंग,निराधार लोकांच्या संदर्भात गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे… व सर्वसामान्य माणसांचे काम तात्काळ झाले पाहिजे.कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही. याची काळजी घ्यावी. व मतदार संघातील सर्वसामान्य माणसाला प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून योग्य असा न्याय मिळाला पाहिजे. अशा प्रकारे एक नाही अनेक मतदारसंघातील अडीअडचणीच्या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धारेवर धरून येणाऱ्या पुढच्या काळात मतदारसंघातील विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी कायद्याच्या अधीन राहून.नियमाने गोरगरीब नागरिकांची सेवा करावी. अशा प्रकारे सूचना आमदार शिंदे यांनी केल्या.
यावेळी चंद्रसेन पाटील जिल्हा परिषद सदस्य माळाकोळी, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर चोंडे, खरेदी विक्री संघाचे उपसभा आदीची उपस्थिती होती .