इतकी नशीबवान नक्कीच नाही की शब्दानी माझ्याशी खेळावं.. खेळता खेळता त्यातच रमावं..
रमता रमता त्यांनाच प्रियकर म्हणावं आणि त्यांच्या कुशीत डोळे मिटुन तासनतास हितगुज करावं….
शब्द कधी काव्यात अडकतात तर कधी वाक्यात इतकं माझं नशीब कुठलं की मी त्यात स्वतःला गुंतवावं…
शब्दही रुसतात , शब्दही भांडतात तेही कुरघोडी करतात माझं कुठलं नशीब की हे सगळं माझ्या वाट्याला यावं…
अनेकदा त्यांच्याशी बोलले ,कित्येकदा त्यांना समजावलं , लव्ह यु म्हणत त्यांनाही मनवलं पण ऐकेल तर तो शब्द कुठला…
ना मी त्यांना कुठला शब्द दिला ना त्यांनी मला शब्द दिला.. एक दिवस त्याला माझी दया आलीच, त्यालाही माझं प्रेम समजलं .. शब्दांनाही भावना असतात.. शब्दानाही बंध जपायचे असतात..
शब्दही प्रियकर
शब्दही माता पिता
शब्दही मित्र
तोच कर्ताकरविता…
शब्दाविना सारेच बंद
शब्दानी जुळते ऋणानुबंध
शब्द बध्द हेची प्रेम
शब्दातीत सारे शब्दबद्ध…
सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री