कंधार ; प्रतिनिधी
नगरपरिषद कंधार तर्फे आजादी का अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत हर घर तिरंगा कार्यक्रमाचे
महिला बचत गटामार्फत तिरंगा झेंडा विक्री
केंद्र तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक , मुख्याधिकारी कारभारी दिवेकर , नायब तहसीलदार कामठेकर, यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.
आजादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे . त्यासाठी हर घर तिरंगा कार्यक्रम राबविण्यात आहे . या उपक्रमात तालुक्यातील सर्व नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक , मुख्याधिकारी कारभारी दिवेकर तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या वतीने करण्यात आले.
आज या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला जपून महिला बचत गटामार्फत तिरंगा झेंडा विक्री साठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या कार्यक्रमास इतर सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.