प्रपोज असावं तर असं

   कोण कशा पध्दतीने व्यक्त होइल सांगता येत नाही..  माझा एक  चाहता खुप दिवसापासून भेटायची इच्छा व्यक्त करत होता.. मी मुद्दाम त्याला टाळत नव्हते तर खरच बिझी होते.. त्याचं फार काही माझ्याकडे काम नव्हतं असं फोनवरील त्याच्या बोलण्यातुन आलं.. नंतर मी विसरून पण गेले.. दोन दिवसापूर्वी कॉफी पित मित्रासोबत बसले होते.. आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर .. तिथे त्याचा फोन आला जो मी उचलला नाही.. त्याने wp केला मॅडम मी जास्त देखणा आहे त्याच्यापेक्षा... खरं तर मेसेज वाचुन खुप हसले पण त्याला काय म्हणायचय आणि कोणाबद्दल बोलतोय हे काही लक्षात येइना.. त्याला म्हटलं कोणाबद्दल बोलताय तुम्ही ?? .. आज तुमच्यासोबत जो कॉफी पित होता ना त्यापेक्षा मी तरुण आहे आणि देखणा पण...तुम्ही पुन्हा एकदा विचार करा..



यावर काय बोलावं कळेना.. मी म्हटलं तो फक्त माझा मित्र होता ..मला  काय करायचय तो कसा दिसतो त्यावर तो म्हणाला, मॅम  पण मला करायचय ना .. मी म्हटलं काय ?? ... तुम्हाला प्रपोज हो... बिचारा तो खरच किव आली पण अशी सगळ्याची दया येउन कसं चालेल ना.. थोडी शांत झाले तर पुन्हा त्याचा मेसेज आला मॅडम कधी येउ उस घेउन... आता उस ही काय भानगड ?? ... तो म्हणाला माझी उसाची शेती आहे 😂😂😂...
 आता तो बिचारा नाही वाटला.. उगाच फालतु टाईमपास नको म्हणुन नंबर ब्लॉक करुन टाकला तर त्याने sms केला मी तुम्हाला भेटणारच.. आता नाही तर पुढच्या जन्मी भेटेन...काय करावं या चाहत्यांचं.. मी पुन्हा येइन.. अडीच वर्षाने असं नक्कीच नाही म्हणाला
 खरच फक्त आनंद घेते अजुन काय करु शकते ना..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *