महात्मा फुले प्राथमिक शाळेत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन

कंधार ; प्रतिनिधी

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवा निमित्त कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ कंधार तालुकाध्यक्ष भास्कर पाटील कळकेकर यांच्या आवाहनानुसार महात्मा फुले प्राथमिक शाळा संभाजीनगर नवामोंढा संभाजीनगर

या शाळेत आजादी का अमृत महोत्सव निमित्त भारत मातेच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले तर साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले . यावेळी मान्यवरांनी महामानवास अभिवादन करून विद्यार्थ्यांनी भाषणे केली .

कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघमारे डी जी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कागणे यु एम , श्री आगलावे ए बी , श्री केंद्रे आर एस ,यामिनी मोटभरे आदींची यावेळी उपस्थिती होती . सूत्रसंचालन बालकताई चंद्रकला तेलंग यांनी केले तर आभार आर एस केंद्रे यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *