कंधार ; प्रतिनिधी
संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार संचलित महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार येथे आज 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर आणा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या निमित्ताने शाळेत भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व उत्कृष्ट भाषण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रस्तुत शाळेचे मुख्याध्यापक श्री जे. जी. केंद्रे साहेब, प्रमुख पाहुणे श्री बी. एस. गुट्टे सर, श्री एच. के. केंद्रे सर, तसेच फिरदोस शेख सर, जि. टी. गुट्टे सर , बी. एस. मुंडे सर ,के. पी. आगबोटे सर , लिपिक गित्ते सर सेवक इबू केंद्रे व विद्यार्थी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन श्री सि. बी. जाधव सर यांनी केले.


