उपमुख्याध्यापक बाबुराव मुसळे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार

कंधार ; तालुका प्रतिनिधी

श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय बारूळ येथील उप मुख्याध्यापक बाबुराव मुसळे यांचा सेवानिवृत्त बद्दल शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष के डी पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संचालक बाबुराव केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती .

श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सर्वश्री तथा माजी आमदार व खासदार डॉक्टर भाई केशवराव धोंडगे, माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे , संस्था अध्यक्ष प्रा.डॉ पुरुषोत्तम धोंडगे , संस्था सचिव मुक्तेश्वरराव धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्याध्यापक बाबुराव मुसळे यांनी सुमारे 31 वर्ष एक महिना 27 दिवस सेवा बजावली . त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये विविध पदे भूषवताना अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आहे त्यांच्या शैक्षणिक कार्याचा ठसा ही समाजामध्ये आदर्श म्हणून गणल्या जातो . बाबुराव मुसळे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा पूर्वी विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला होता .

त्यांनी उमरगा खोजा येथे सरपंच म्हणूनही कार्यकाळ सांभाळला आहे . सामाजिक , शैक्षणिक व राजकीय असा अनुभव असणारे बाबुराव मुसळे यांच्या दिनांक 30 जुलै रोजी सेवानिवृत्ती सत्कार शाळेच्या वतीने संपन्न झाला . यावेळी कायक्रमात प्रमुख मार्गदर्शक अशोक गुट्टे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना आजच्या विद्यार्थांने स्वतः ची स्पर्धा स्वतःशी करावे असे अनेक उदाहरणे देऊन सांगितले .

यावेळी कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अनिल वट्टमवार , पोलीस पाटील तथा शाळेचे उपाध्यक्ष संजय पाटील जाधव , सदस्य हनुमंत पाटील कळकेकर , शहाजी नाईक , खुलाश कागणे , विठ्ठल कागणे , बगाडे सर , यु.डी मोरे , सोम चे सर यांच्यासह उमरगा खो.या गावातील प्रतिष्ठित नागरिक , नातेवाईक या कार्यक्रमास उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय बारूळ येथील शिक्षकांनी परीश्रम घेतले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोनटक्के यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *